Sunday, November 15, 2015

पॅरिसमधील हल्यांच्या निमित्ताने...

पॅरिस मध्ये झालेल्या हल्ल्यांच्या बातम्या आपण वाचतोय. खरंतर हल्ले निशेधार्यच आहेत. या हल्ल्यांचे समर्थन केवळ हल्लेखोरच किंवा त्यांना पाठींबा देणारेच करू शकतात. कोणताही सामान्य माणूस इतक्या दूर वर बसून केवळ निषेधच  करेल. त्या हल्ल्याची तीव्रता आपल्याला दिसतीये वृत्तपत्रांमधील वृत्तांकनावरून, दूरचित्रवाणी वरील दृश्ये पाहून आणि प्रत्यक्ष ज्या लोकांना या हल्ल्यांचा अनुभव घ्यावा लागला त्यांची परिस्थिती पाहून. असाच किंवा याही पेक्षा भयंकर हल्ला मुंबईत झाला होता. आपल्या "Third World" मधल्या देशात हा हल्ला  झाला तेव्हा जागतिक वृत्तसंस्थांनी एवढ्या प्रमाणात त्याचे details उपलब्ध करून दिले होते? युरोप, अमेरिकेतल्या लोकांना त्या हल्ल्यांविषयी तिथल्या वृत्त संस्थांनी एवढ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली होती? आजचा रविवारचा पेपर तर पूर्ण पान भर बातम्या छापून आलाय. एक भावना अधोरेखित करायची आहे इथे - आमच्या देशाने असे खूप घाव सोसलेत. त्याची दाखल अजूनही UNO मध्ये घेतली जात नाही. परंतु, युरोप, अमेरिकेत असे काही घडले की त्या घटनेची दाहकता जगभर प्रभावीपणे प्रसृत केली जाते. याचे कारण - जागतिक प्रसार माध्यमांचा आमच्या देशातील प्रसार माध्यमांवर वरचष्मा, वचक आहे की काय असा प्रश्न पडतो. आमच्या देशावर झालेले हल्ले ३-४ दिवस पश्चिमेकडील देशात प्रसार माध्यमांकडून चर्चिले जातात का? हल्ल्यांबद्दल/विद्रोधात "आपण एकत्रितपणे लढून दहशतवादाला चिरडून टाकले पाहिजे" असं केवळ वक्तव्य त्यावेळी केलं जातं. फ्रांस मधल्या हल्ल्याला उत्तर द्यायला अमेरिका, रशिया, बेल्जिअम इ. कृती करताना दिसतील. आम्ही आमचीच मदत करतो! आम्हाला कोणाचा भक्कम असा पाठींबा नाही. आमचे पोलिस जिवाचं रान करून पुरावे गोळा करून दहशतवाद 'सिद्ध' करतात तेव्हा कुठे कोर्ट दहशतवादाला सजा सुनावते आणि आमची प्रसार माध्यमं सजा रद्द व्हावी म्हणून बकाल चर्चा घडवून आणतात! ओबामा यांचा आजचं वक्तव्य आहे - "Twisted ideology behind attacks on civilized world". अशा हल्ल्यांमध्ये जीव कोणाचाही जावो, गेलेला जीव civilised किंवा uncivilised अशा वर्गीकरणात कसा बसवला जाऊ शकतो? आमच्या माध्यमांनी आपल्या देशाच्या व सामान्य नागरिकांच्या उमेदीला चालना मिळेल असे वृत्तांकन करावे अशी कायमच इच्छा आहे.वृतांकानात आपल्या देशातले वातावरण गढूळ होईल असे काही नसावे हे प्राणपणाने जपावे. आपल्याकडील वृत्तांकन, प्रसिद्धी माध्यमेच इतका कलह वाढवत असल्यामुळेच कदाचित आपल्या देशात आता दहशतवादी 'हल्ले' करण्याची गरज उरली नाहीये असेही दहशतवाद्यांना वाटत असावे!

No comments:

Post a Comment